प्रेरणा संस्कार
सहकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याचे, त्याचे हसत खेळत प्रशिक्षणाचे सोपे, स्वस्त व चिरकाल टिकणारे उत्तम साधन म्हणजे प्रेरणा संस्कार फलक/पोस्टर्स. प्रेरणा संस्कार फलक बहुरंगी व सचित्र, आकर्षक असून कुठेही सहज टांगता येतील. सहज ओल्या फडक्याने पुसताही येईल व नव्या सारखे करता येईल. देखभाल खर्च शून्य. कुठेही घरपोच पाठविण्याची सोय. तुम्हाला हव्या असलेल्या प्रेरणादायी संदेशाचे प्रेरणा संस्कार फलकही तयार केले जाऊ शकतात.
दर पाठ.खर्च
12×18 इंच 350/-रू. 50 रू.
18×24 इंच 500/-रू. 75 रू.
24×36 इंच 750/-रू. 100 रू.
*3 हून अधिक प्रेरणासंस्कार घेतल्यास 10% सूट व पाठविण्याचा खर्च माफ.
अधिक माहितीसाठी nachiketprakashan@gmail.com वर इमेल करा किंवा 9225210130 वर लगेच फोन/एस.एम.एस. करा.
सूचना संस्कार
अनेक ठिकाणी, अनेक वेळा आपल्या सभोवतालची माणसे चुकीचे, त्रासदायक ठरणारे वागत असतात. आपल्याला ते खटकत असते, पण सांगायला जावे तर राग येतो, आपण अप्रिय होतो, माणूस तुटतो आणि या भीती पोटी आपण त्याला सांगत नाही आणि त्यामुळे हे असेच सुरू राहते.
प्रत्यक्ष तोंडावर न सांगता लोकांना योग्य ते सांगण्याचा आणि त्यांच्या वागण्यात योग्य ते बदल घडविण्याचा उत्तम उपाय म्हणजे सूचना संस्कार पाट्या. कारण तसेही माणसावर बोलण्यापेक्षा लिखिताचा अधिक परिणाम होतो. विविध विषयांवर मूलभूत सूचना देणाऱ्या विविध आकर्षक प्रभावी पाट्या तयार आहेत. त्याही ‘घ्या आणि लावा’ अशा तयार स्वरूपात. कुठेही घरपोच पाठविण्याची सोय आहेच. आपण फक्त हवा तो संदेश देणाऱ्या पाट्या निवडा. येथे नमुना पाटी देत आहोत. आपल्याला हव्या असलेल्या वेगळ्या संदेशाच्याही पाट्या बनवून दिल्या जाऊ शकतात. या बहुरंगी, आकर्षक, सचित्र, प्रभावी पाट्या चिटकवल्या जाऊ शकतात किंवा सहज टांगल्या जाऊ शकतात.
सूचना संस्कार दर
आकार 4×12 इंच 150 रू.
आकार 4×18 इंच 250 रू.
* किमान 3 पाट्या घेणे आवश्यक
* पाठविण्याचा खर्च पहिल्या 3 साठी 50 रू
* एकाच पाटीच्या जादा प्रती घेतल्यास सवलत
* 5 हून पाट्या घेतल्यास पाठविण्याचा खर्च लागणार नाही.
अधिक माहितीसाठी nachiketprakashan@gmail.com वर इमेल करा किंवा 9225210130 वर लगेच फोन/एस.एम.एस. करा.
इतरांच्या ही वेळेचे भान ठेवा !
दुसऱ्याची बाजू शांतपणे ऐका !
पुरेसा वेळ घेऊन कार्यालयात या !
रक्कम स्वत:च भरा !
कर्ज हक्क नव्हे सोय !
जास्त व्याज जास्त धोका !
विश्वासावर पैसा ठेवा !
थेंबे थेंबे तळे साचे !
अनावश्यक बसून
वेळ घालवू नका !
रक्कम मोजायला कोणालाही देऊ नका !
जमानत विचारपूर्वक द्या !
किमान कर्ज, अधिकतम हप्ता, संपूर्ण कर्जमुक्ती !
कर्ज संपूर्ण संपवा !
कर्जफेड वेळीच करा !
पैशाने पैसा वाढतो!
व्याज नाही, विश्र्वास प्रथम !
वेळेचा पूर्ण वापर करा !
संस्थेची प्रगती तर कर्मचाऱ्यांची समृध्दी !
वाचवाल तर वाचाल!
शिकाल तर टिकाल!
माहितीच्या युगात अग्रेसर रहा !
आजचे काम आजच!
कार्यक्षमता हिच सुरक्षितता !
उद्या नाही, आज, आताच !
तत्पर प्रतिसादाने कार्यक्षमतेची ओळख !
सुसंघटित काम-सोपे-सुलभ काम !
सुसंघटित रहा धावपळ टाळा !
असेल नियोजन तर नसेल टेन्शन !
नियोजन:वेळेचे, कामाचे माणसांचे !
सस्मित कामाने आनंद वाढतो !
समस्या नाही, समाधान व्हा !
प्रश्न नाही, उत्तर व्हा !
आशावादी, प्रयत्नवादी बना !






