![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
निवडक बॅंकिंग निवाडे
नागरी सहकारी बॅंका ह्या आपल्या समाजाभिमुख कार्यक्रमानुसार ठरविलेल्या कार्यक्षेत्रामध्ये शाखाविस्तार करीत असतात.बॅंका आपल्या कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी ठेवी. कर्जे, नफा क्षमता यामध्ये वाढ होण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम आयोजतात व ते कार्यान्वित करतात, त्याला शाखांकडून प्रतिसादाची अपेक्षा असते.
सहकार खात्याच्या मागील 20 वर्षांतील नागरी बॅंकांना लागू असणाऱ्या सर्व परिपत्रकांचे एकमेव व प्रथम संकलन. एकूण 106परिपत्रकांचा यात समावेश आहे. पृष्ठे 160 असून आकार एक अष्टमांश डेमी आहे. नागरी बॅंकेच्या प्रत्येक शाखेत असावेच, असे हे संकलन असून हाताळण्यास अत्यंत सुलभ आहे.
सहकार खात्याच्या 1981 ते 2007 या 27 वर्षांतील नागरी व कर्मचारी पतसंस्थांना लागू असणाऱ्या सर्व परिपत्रकांचे प्रथम व एकमेव संकलन.वापरण्यास अत्यंत सुलभ.प्रत्येक पतसंस्थेच्या प्रत्येक शाखेत असावेच,असे हे संकलन आहे.यात एकूण 54 परिपत्रकांचा समावेश आहे.
नचिकेत प्रकाशन नागपूर या संस्थेने “ऑडीट मार्गदर्शक” हे पुस्तक माहे एप्रिल 2007 मध्ये प्रकाशित केलेले आहे. या पुस्तकाचे संपादन श्री. एस.एन.वैद्य, निवृत्त विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 यांनी केलेले आहे. श्री. वैद्य हे महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यात विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 म्हणून कार्यरत होते. पूर्ण शासकीय सेवा झाल्यावर निवृत्त झाले. राज्य शासनात असतांना ते अनेक वर्ष पुण्याला सहकार महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून परसेवेवर होते. त्यांचा ऑडिट विषयाबाबत अभ्यास, वाचन, अनुभव दांडगा आहे. अशा व्यक्तिनी “ऑडिट मार्गदर्शक” पुस्तकाचे संपादन करणे याचा लाभ फार मोठ्या प्रमाणावर सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करणाऱ्या लेखापरीक्षकाला होणार आहे. या पुस्तकात ऑडिट बाबत योग्य मार्गदर्शन केलेले आहे. यात खालील प्रकरणे आहेत.
प्रामुख्याने नागरी बॅंका /नागरी पतसंस्था आणि कर्मचारी पतसंस्था यांच्यातील कर्मचाऱ्यांशी संबंधित सर्व पैलूंवर संपूर्ण व एकत्रित मार्गदर्शन मराठीतून प्रथमच उपब्ध त्यांच्या व्यवस्थापनासाठी अत्यंत माहितीपूर्ण मार्गदर्शक व संग्राह्य पुस्तक. पतसंस्था व्यवस्थापन या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक डॉ. अविनाश शाळीग्राम यांनीच हे पुस्तक नचिकेत प्रकाशनासाठी खास लिहिले आहे. या संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी यासोबत तज्ज्ञ संचालक असणाऱ्या सीए नाही यांचा निश्चित उपयोग आहे.
नागरी बॅंका, नागरी पतसंस्था व कर्मचारी पतसंस्था यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी कसा असावा? त्याची भूमिका व जबाबदारी स्पष्ट करण्यासाठी डॉ. माधव गोगटे यांचे हे पुस्तक आजच्या आणि उद्याच्याही अर्थात सी.ई.ओ. होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यासाठी अत्यावश्यक असेे पुस्तक आहे. सी.ई.ओ. च्या मार्फत संस्थेत उत्तम काम करून घेण्याकरिता सीईओचे पद समजून घेण्यासाठी वरील संस्थाचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांनीही हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. शाखा व्यवस्थापन या द्वितीय आवृत्ती निघालेल्या पुस्तकाचे लेखक डॉ. माधव गोगटे यांनीच अतिशय कळकळीने व सांगोपाग पद्धतीने यात संपूर्ण विषय ठेवले आहेत.
नागरी बॅंक संदर्भ
पतसंस्था संदर्भ
कर्जवसुली मार्गदर्शक
बकिंगमधील मराठीतील एकमेव
किंमत विश्लेषण आणि ताळेबंद विश्लेषण
कर्मचारी सेवा पुस्तिका
पतसंस्था फॉर्मेटस
बॅंकिंग धोरणे
प्रत्येक लहान मोठ्या दुकानदाराने वाचलेच पाहिजे असे
[...] बँकिंग प्रकाशने [...]
Dear Sir,
I am interested in banking related books especially ” Sanchalak Margdarshak”. please let me know the details as how to order and make the payment for the same.
Thank you!!