इतिहासाचा विश्र्वसनीय दस्तावेज सादर करून सडेतोड उत्तर देणारे
रामजन्मभूमी मुक्तीचे अभूतपूर्व आंदोलन
भारत देशाच्या उद्धारासाठी, त्याला स्वावलंबनाच्या, समृद्धीच्या पायावर उभे करण्यासाठी सुरू झालेले, परंतु सर्वाधिक बदनाम करण्यात आलेले आंदोलन म्हणजे रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन. या आंदोलनाचे नाव देखील उच्चारले तरी तुम्ही या, रामाच्याच देशात वाळीत टाकले जाता. परंतु, एखाद्याला पूर्वग्रह बाजूला ठेवून या आंदोलनाची इत्यंभूत माहिती करून घ्यायची असेल तर, ज्येष्ठ पत्रकार श्री. दि.भा.घुमरे यांनी लिहिलेले “रामजन्मभूमी मुक्तीचे अभूतपूर्व आंदोलन” हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
अत्यंत सन्माननीय पत्रकार म्हणून ज्यांना मान्यता आहे, अशा श्री. दि.भा.उर्फ मामासाहेब घुमरे यांच्यासारख्या अभ्यासू पत्रकाराने हे जे पुस्तक लिहिले आहे, ते निव्वळ संशोधनावर व पुराव्यांवर आधारित नाही तर, वाचनीयही झाले आहे. सहसा हे तीन गुण एकाच पुस्तकात आढळत नाहीत. नचिकेत प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित करून मराठी वाचकांच्या हाती एक विश्वसनीय दस्तावेजच सोपविला आहे. या आंदोलनातील विविध टप्प्यांवरील कार्याची माहिती देणाऱ्या पुस्तिका यांच्या आधारे तसेच एक कार्यकर्ता या नात्याने जे पाहिले, ऐकले, अनुभवले त्या आधारानेही हे पुस्तक सिद्ध केल्याचे स्वत: लेखकाने म्हटले आहे.
अयोध्या रामजन्मभूमीसाठी 1984 ते 1992 या आठ वर्षांच्या कालखंडात झालेले राष्ट्रव्यापी आंदोलन हे एक अभूतपूर्व आणि अद्वितीय आंदोलन ठरले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी 1857 चे पहिले स्वातंत्र्यसमर आणि त्यानंतर 1920 ते 1942 या काळात झालेल्या स्वातंत्र्य आंदोलनानंतर, संपूर्ण देश ढवळून काढणारे जर कोणते एक व्यापक आंदोलन झाले असेल तर ते रामजन्मभूमी आंदोलन होय. हे आंदोलन मुख्यत: हिंदूंनी केलेले आंदोलन होते, तेही एका मंदिरासाठी केलेले आंदोलन होते, त्यामुळे त्याला राष्ट्रीय आंदोलनाची सर येऊ शकत नाही, असे त्याबाबत म्हटले गेले आहे आणि पुढेही म्हटले जाईल. परंतु असे म्हणणारे या आंदोलनाचा प्रारंभ कसा आणि कशामुळे झाला, याचा जर शोध घेतील तर त्यांना सोमनाथच्या जीर्णोद्धारात या आंदोलनाची बिजे दडलेली होती, हे उमगून येईल. सोमनाथच्या जीर्णोद्धारातून ही जी प्रेरणा मिळाली, ती प्रथम रामजन्मभूमी मुक्तीसाठी अयोध्येत अनेक वर्षांपासून सतत धडपडणाऱ्या संत-महंतांना आशेचा केवळ किरणच नव्हे तर प्रकाश ठरली.
विश्व हिंदू परिषदेच्या हाती हा विषय येताच विहिंपने विविध कार्यक्रमांद्वारे साऱ्या देशात जनजागृती सुरू केली. तीन धर्मस्थानांची मुक्ती, या विषयाला राष्ट्रीय विषयांच्या कोटीत नेऊन बसविले. विहिंपने हिंदूंना चिथवले आणि त्या चिथावणीने हिंदूंनी अयोध्येत धडक मारून बाबरी मशीद पाडली, असा जो सरळसोट आरोप आजही केला जातो. तो बव्हंशी हिंदुद्वेष्ट्या, हिंदुत्वविरोधी आणि भाजपाविराधी क्षेत्रातून, त्यांच्या त्यांच्या राजकारणाच्या सोयीसाठी केला जातो आणि काही अंशी तो अज्ञानापोटी केला जातो. या सर्व आरोपांची उत्तरे विहिंपने 1994 ते 1992 या आठ वर्षात धार्मिक, ऐतिहासिक, राष्ट्रीय या अंगांनी जे विविध कार्य केले त्यातून मिळतात. ती सर्व माहिती प्रस्तुत पुस्तकात विस्ताराने देण्यात आली आहे.
रामजन्मभूमी आंदोलन हे चुन्याविटांनी बांधावयाच्या एका मंदिराचे आंदोलन नसून, शेकडो वर्षांनंतर घडून आलेल्या ऐतिहासिक बोधाची हिंदूंमध्ये झालेली ती विराट जागृती आहे, असे मत नोबेल पारितोषिक विजेते विद्याधर नायपॉल यांनी म्हटले आहे. रामजन्मभूमी आंदोलनाचे मूल्यमापन करणाऱ्यांनी या दृष्टीने विचार करून पाहावा. हिंदूंना चिथावल्यामुळे ते उत्तेजित झाले आणि थेट अयोध्येत घुसून त्यांनी गुंडागर्दी करून मशीद पाडली, असे ते आंदोलन नव्हते तर, पूर्ण अभ्यास करून, क्रमाक्रमाने, सनदशीर मार्गांनी, धार्मिक तथा राष्ट्रीय भावनांना साद घालून, अभ्यासपूर्ण रीतीने आपली बाजू मांडून, न्यायप्रक्रियेत आवश्यक असलेले पुरावे सादर करून हे आंदोलन करण्यात आले. तो सारा तपशील या पुस्तकात विस्ताराने मांडला आहे.
या पुस्तकातील प्रकरणे बघितली तर, लेखकाने किती बारकाईने आणि तक्रारीला कुठूलाही वाव राहू नये, या दक्षतेने या पुस्तकात सर्व माहिती देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, ते लक्षात येईल. जन्मभूमीचा पूर्वेतिहास, सोमनाथ जीर्णोद्धारानंतर…., अभूतपूर्व आंदोलन, उत्तरप्रदेशातील दहशत पर्व, कारसेवा संग्राम, उभयपक्षी पुरावा, बाबरीखालून मंदिराचे अवशेष, जय श्रीराम हो गया काम, रामजन्मभूमीचा निर्णायक पुरावा, प्रतिक्रिया, न्यायालयातील खटले, बाबरीखाली 10 व्या शतकातील मंदिर, काशी विश्वनाथ व श्रीकृष्ण जन्मभूमी ही या पुस्तकातील प्रकरणांची नावे आहेत. ती पाहिली की, या पुस्तकाची सर्वव्यापकता लक्षात येईल.
एवढ्यावरच लेखक थांबले नाहीत. त्यांनी सात परिशिष्टांच्या माध्यमातून अधिकची विश्वसनीय माहिती देखील देण्याचा प्रयत्न केला आहे. रामजन्मभूमीसाठी झालेले संघर्ष, अयोध्येचा विष्णुहरि मंदिर शिलालेख, शिलालेखाचा अर्थ, सहभागी कारसेवक, सर्व आवाहने व्यर्थ इत्यादी परिशिष्टांमुळे वाचकांच्या ज्ञानात अधिकची मूल्यवान माहितीचीच भर पडते.
विशेष म्हणजे उभयपक्षी पुरावा हे प्रकरण तर प्रत्येकाने वाचावेच असे आहे. त्यातून या आंदोलनाबाबत मनातील सर्व गैरसमज दूर झालेच म्हणून समजा. मंदिराच्या बाजूचे प्राचीन, मुस्लिम तसेच युरोपियनांचे पुरावे, राजस्व नोंदी, पुरातत्त्वीय पुरावे इत्यादी वाचनीय आणि नवनवीन माहिती देणारे आहेत. जन्मस्थानासंबंधी बुद्धिभेद, हिंदूंचा सातत्यपूर्ण दावा, मुस्लिम लेखकाची कोलांटउडी, बाबरी कमेटीने दिलेला पुरावा हे जर वाचले तर, या आंदोलनाला एका विशिष्ट उद्देशाने कसे बदनाम करण्यात आले, हे लक्षात येते.
बाबरी खाली झालेल्या उत्खननातून जे मंदिराचे अवशेष मिळाले, त्यांची छायाचित्रे या पुस्तकात दिली आहेत. ती छायाचित्रे या आंदोलनाला बदनाम करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहेत. उत्तम समर्पक मुखपृष्ठ, भरपूर छायाचित्रे आणि सुटसुटीत मांडणी यामुळे पुस्तकांची निर्मिती देखणी व आकर्षक झाली आहे.
एकूणच हे पुस्तक रामजन्मभूमी आंदोलनावर हेतुपूर्वक, स्वार्थी आणि उथळ आरोप करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणारे आहे, यात शंका नाही. या आंदोलनात सहभागी झालेल्यांनी, त्यांच्या सहानुभूतीदारांनीच नव्हे तर, या आंदोलनाला विरोध करून आपली राजकीय स्वार्थाची पोळी शेकून घेणााऱ्यांनी देखील हे पुस्तक एकदा तरी वाचले पाहिजे. तरच या आंदोलनाची अभूतपूर्वता आणि व्यापकता त्यांच्या लक्षात येईल.
रामजन्मभूमी मुक्तीचे अभूतपूर्व आंदोलन
लेखक : दि.भा.घुमरे
कि. 150 रू.
नचिकेत प्रकाशन :
24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15, भ्र. 9225210130
देवस्वरूपा कामधेनुचे वैज्ञानिक महत्व
गायीचे वैज्ञानिक महत्त्व अपार आहे म्हणूनच तिला आपल्या ऋषी मुनीनी जितके महत्वाचे देवतेचे स्थान दिले आहे किंबहुना तिच्या शरीरात सर्व देवतांचा निवास असल्याचे सांगितले आहे. परंतु आजच्या नवीन पिढीत गायीचे हे वैज्ञानिक महत्व पुन्हा सांगण्याची निकड निर्माण झाली आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी नचिकेत प्रकाशनाने देवस्वरूपा कामधेनु : वैज्ञानिक महत्त्व हे अत्यंत अभ्यासपूर्ण, संदर्भपरिपूर्ण संग्राह्य पुस्तक प्रकाशित केले आहे प्रा. विजय यंगलवार यांनी केले परिश्रमपूर्वक त्यांचे संकलन संपादन आहे. या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ विद्वान श्री रामभाऊ पुजारी यांनी लिहिली आहे तीच परिचयार्थ देत आहोत.
“गाय रूद्राची माता, वसूंची पुत्री, अदितिपुत्रांची बहिण आणि धृतरूपी अमृतांचे भंडार आहे. प्रत्येक विचारवंतांना मी हेच समजावू इच्छितो की, निरपराध आणि अवध्य अशा गोमातेचा वध करू नका.” ऋग्वेदातील गो सुक्ति म्हणून ज्या ऋचा आहेत त्यातील पुढील ऋचा त्या काळचे जनमानस व्यक्त करते.
माता रूद्राणां दुहिता वसूनां स्व साऽऽदिव्यानाममृतस्य नाभि:। प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गामनागामदिनीं वधिष्ठ ।।
आजचा मानव प्रगतीच्या शिखरावर पोचतो आहे. भौतिकी आणि रसायन शास्त्रादिंच्या चक्रव्युहात अडकलेला हा अभिमन्यू मानव हे भावनिक वा धार्मिक आवाहन नाकारतो. कारण त्याच्या मते विज्ञान जर आपल्या सर्व गरजा भागवू शकते तर या अशा धार्मिक व भावनिक दाखल्यांची उपयुक्तता काय? असा प्रश्र्न त्याच्यापुढे येतो. वस्तुत: पूर्वाग्रह सोडून जर विचार केला तर असे आढळून येईल की धर्म आणि विज्ञान या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मानवी शरीर हे पंचभूतात्मक आहे व त्यात एक अद्भूत सामंजस्य असणे आवश्यक आहे, हे आता सर्व विज्ञानप्रेमी मानतात. हे सामंजस्य टिकवून ठेवण्यासाठी एक सूक्त अजून उदधृत करतो.
“अन्नाद्भवति भूतानी पर्जन्यादन्न सम्भव: यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ:कर्म समुद्भव:”
यज्ञामुळे पर्जन्य, त्यामुळे अन्न व अंततोगत्वा आपले समुचित पोषण असे चक्र अव्याहत सुरू आहे. अशा या यज्ञ कर्माची प्रधानकारक गौ आहे. गाईच्या दुधापासून दही, लोणी, धृत आणि गोमूत्र, गोमया बद्दल, आता पर्याप्त संशोधन झाले आहे आणि या सर्व वस्तू यज्ञीय साधने होत. विस्तार भयास्तव याच्या अधिक विवेचनाची येथे आवश्यकता नाही. परंतु अवश्य असे म्हणता येईल की, धार्मिक, आर्थिक, आणि वैज्ञानिक अर्थाने या संपूर्ण परमेश्र्वरी सृष्टिमध्ये गाईचे स्थान सर्वोपरी आहे, विशेषत: भारतासारख्या कृषीप्रधान देशाला याचे विस्मरण होता कामा नये. “गाव प्रतिष्ठा भूतानाम्” असे म्हणून आपल्या शास्त्रज्ञांनी या तथ्याचा स्वीकार केलेला आहे. प्राणिमात्रांच्या सर्व क्रियाकलापांमध्ये गो महिमा इतकी व्याप्त झालेली आपणास खालील गोशब्द कोषांकडे दृष्टिक्षेप टाकल्यास कळेल. गोत्र, ऋषी, पर्वत, नद्या, वनस्पती, धान्य, तीर्थस्थाने, ईशविग्रह, उपकरणे, सूर्य, चंद्र, नक्षत्र, तारका समूह, अखिल ब्रम्हांड गो शब्दांच्या विविध रूपाने अलंकृत आहेत आणि हेच गोरक्षा अभियानाचे सूत्र आहे. अदिती पदाचे दोन अर्थ आहेत.
1. दिति-तुकडे करणे-विभागणे अर्थात जे तुकडे करण्यायोग्य वा विभागण्यायोग्य नव्हे ती अदिति
2. अदनात अदिति: भक्षण करण्यायोग्य-दूध-दही, लोणी, तूप देणारी व कृषी योग्य बैल देणारी आणि तद्द्वारा धान्य-संपत्ती व वैभव देणारी हे दोन्ही अर्थ गाईचे पर्यायवाची शब्द आहेत.
“अदितिद्यौंरदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्र:। विश्र्वेदेवा अदिति: पंचजना अदितिजीत मदितिर्वनिस्वम् ।।”
अदिती द्युलोक, अन्तरिक्ष, माता, पिता, पुत्र व सर्व देवता या सर्वामध्ये आहे. अदिती हिच अतीत कालीन वस्तुसमूह असून भविष्यकालीन वस्तुसमूह तिच्याच मुळे आहेत.
खालील संकलित गो-शब्द भंडाराकडे दृष्टिक्षेप टाकल्यास आपणास ऋग्वेदाच्या उपरोक्त सूक्ताची यथार्थता पटेल.
गो आधारित शब्द कोश
तीर्थ क्षेत्र : वनस्पति धान्य :
गोकर्ण गोकृष्णा-(अश्र्वगंधा)
गोतीर्थ गोक्षय
गोत्र : गोजिव्हा
गोयनका गोधूम (गहू)
गोभिल गोस्तनी (मनुका)
ऋषी : गोचन्दन
गौतम गोरखमुंडी-गोखरू
गोभिल उपकरण :
गोरखनाथ गोकीळ-(मूसळ-नांगर)
गोस्वामी गोदारण- कुदळ
उपनिषद व ब्राम्हणे : गोमुखी-(जपाची पिशवी), गोपाल तापनी उपनिषद, गवाक्ष -खिडकी, गोभिलीय गृह्यसूत्रे, गोपथ ब्राम्हण
ईशविग्रह देवता व विशेषनाम :
गोकर्णेश्वर, गोदुह, गोणी (पात्र), गोपीजनवल्लभ, गोधन
गोचारक, गोत्रसूता (पार्वती), गोपाल, गोच्छगल, गोमभिद् (इंद्र)
गोधा (वळू), गोत्र, गोपूत्र (कर्ण), गोवर्धन (पर्वत), गोसूक्त
गोमय, गोरखपूर (शहर), गोचरी (भिक्षावृत्ती), गोचर्म, गोमति (नदी)
गोधुली, गोमूत्र, गोदावरी (नदी), पंचगव्य, गंगा (नदी)
गोष्ठ, गोअग्र, गोवत्स, गोअर्घ, गोदान, गोईठा (गोवऱ्या)
गो चा यौगिक अर्थ : गच्छति इति गौ: = जी भ्रमणशील आहे, गतिशील आहे ती च गौ आहे. संपूर्ण ब्रम्हांड गतिशील आहे म्हणून या अर्थाने संपूर्ण विश्र्व गो च आहे. विश्र्वात अस्तित्वात असलेल्या पदार्थाचा वाचक शब्द गो आहे. निघंटुकारानुसार स्व:। पृश्र्नि:। नाक:। गौ:। विष्ट्प। नभ: ही पदे द्युलोक व सूर्याचे वाचक असून या नुसार गो चा अर्थ स्वर्गलोक, द्युलोक आणि सूर्य असा होतो. सूर्य तथा अन्य प्रकाश किरणे ही गो-पद वाच्य आहेत. निघंटुनुसार किरण वाचक एकूण 15 शब्द आहेत, त्यापैकी एक गो आहे. प्रकाश किरणे विश्र्वव्यापी असल्याने गो विश्र्वव्यापी आहे. “गावोहि विश्र्वस्य मातर:” या उक्तिचे आपोआपच समर्थन होते. याचप्रमाणे नक्षत्रांनासुद्धा ते भ्रमणशील (गतिशील) असल्याने गो ही संज्ञा आहे. याप्रमाणे द्युलोक व त्याच्या अंतर्गत येणाऱ्या पदार्थांचा वाचक शब्द गो आहे.
निघण्टुकारानुसार पृथ्वीवाचक 21 वैदिक शब्द आहेत. त्यापैकी एक गो आहे. याचाच अर्थ पृथ्वीवर असलेले सर्व गतिमान प्राणी गो या शब्दाने व्यक्त होतात. आपल्या शरीरावर असलेले रोम: आपली इंद्रिये व पृथ्वी गर्भात असलेली सर्व खनिजे, आपली वाणी, वक्तृत्व आणि शब्द हे सर्व गो पदांनी बोधित होतात. याचप्रमाणे भूमीपासून उत्पन्न सर्व अन्न-धान्य, वृक्ष आणि वनस्पती हे सर्व गो या पदांनी व्यक्त होतात. ज्याप्रमाणे गाईंपासून उत्पन्न होणारे दूध, दही, लोणी, ताक, तूप आदी पदार्थांना गो म्हणण्याचा प्रघात आहे. तद्वतच भूमिरूपी गौ पासून उत्पन्न सर्व वस्तू गो शब्दांनी परिलक्षित होतात व या अर्थाने गो द्युलोक वाची पद आहे.
गो शब्द अन्यान्य भाषांमध्ये पाहू गेल्यास एक मनोरंजक वस्तुस्थिती आपल्या समोर येते ती आपण बघू या.
1. प्राचीन इंग्लिश - Anglo Saxan कू Cu
2. प्राचीन सेक्सन Ku कू
3. मध्य कालीन डच Koe कोए
4. डच Koe कोए
5. निम्न जर्मन Ko को
6. उच्च जर्मन chuo चुओ कुओ
7. जर्मन Kuh कु
8. स्विडीश Koe को
9. डॅनिश Ko को
10. आर्यन Gwous गौ (द्वि: Gwom गाम)
11. संस्कृत : गौ-गां-गो
यावरून हे स्पष्ट आहे की गो शब्द वैदिक भाषेतून इतर भाषेत संक्रमित झाला. विदेशी भाषेतील उच्चाटण तथा लिपीच्या मर्यादेमुळे गो शब्दाचे बिघडलेले रूप आजही त्या भाषांमध्ये पहावयास मिळते.
अशी ही सर्वव्यापी, सर्वमंगलकारक, परम पूजनीय श्रीमती गौ जिच्यामुळे संपूर्ण ब्रम्हांड आणि जीवनजगतमात्र उपकृत आहोत, ती ऐहिक व पारमार्थिक दृष्टीने पूजनीय आहे. या साठीच
“सर्वदेवमये देवि सर्व दैवेरलंकृते। मातर्ममाभिलषितं सफलं कूरू नंदिनी।। “
असे सार्थ विवेचन प्राचीन शास्त्रमर्मज्ञांनी केले आहे. श्रीमती गौ शास्त्रदृष्ट्या पशू नव्हे. शास्त्राचेच एक वचन आहे “तिलं न धान्यं-पशवो न गाव:” म्हणून तिला पशू कृपया संबोधू नये. साक्षात् परमात्मा श्रीकृष्णाने आपल्या आचरणाने गोपालन आणि गोसंरक्षणाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तो कृपया लक्षात ठेवा. केवळ गाईच्या स्पर्शाने अनेक रोग बरे होतात, अनुभव घेऊन पहा.
भारतीयांनी जेव्हापासून गोसेवेची उपेक्षा केली, तोच आपल्या दुर्दशेचा आरंभ बिंदू आहे, हे जर नीट समजून घेतले तर आम्ही सर्व भारतीय आता वेळ न दवडता गोरक्षा, गोसंवर्धन, गोपालन आणि गोसेवेसाठी कटिबद्ध होऊ या आणि आपल्या देशास पूर्ववत सुखी,संपन्न आणि सदाचारी होण्यास सिद्ध होऊ या.
देवस्वरूपा कामधेनू : वैज्ञानिक महत्त्व
नचिकेत प्रकाशन : प्रा. विजय यंगलवार किंमत : 125 रू.
गो माहात्म्य सांगणारी गोसूक्ते
माणसाच्या आरोग्याच्या व अन्यही प्रकारच्या वाढत्या चिंता दूर करण्याचे गायीचे सामर्थ्य लक्षात घेऊन नचिकेत प्रकाशनाने गायी संबंधी तीन उत्तम, संग्राह्य व अत्यंत उपयुक्त पुस्तके प्रकाशित केली आहेत.
(1) देवस्वरूपा कामधेनु : वैज्ञानिक महत्त्व (2) पंचगव्य औषधोपचार आणि (3) गो माहात्म्य सांगणारी गोसूक्ते ही तीन पुस्तके होत. तीनही पुस्तके वेगवेगळ्या पैलूचा परामर्श घेणारी आहेत.
गायीचे माहात्म्य जितके वर्णावे तितके थोडे आहे. अशा या कामधेनुचे विविध ग्रंथात विविध थोर पुरूषांनी विविध देशात विविध भाषां मध्ये वेगवेगळे जे गोमाहात्म्य वर्णन केले आहे. त्याचे अत्यंत मनोरम व वाचनीय व संग्राह्य संकलन गो माहात्म्य सांगणारी गो सुक्ते या रूपाने नचिकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकातील गोमाहात्म्य सांगणारा थोडा भाग असा.
गाईची उत्पत्ती
गाईच्या उत्पत्तीची कथा “शतपथ ब्राम्हण” ग्रंथात पुढीलप्रमाणे सांगितली आहे.
दक्ष प्रजापतीने प्राणिसृष्टी निर्माण केल्यानंतर थोडे अमृत प्राशन केले. त्या अमृताने तो संतुष्ट झाला. त्यावेळी त्याच्या नाकातून जो श्र्वास बाहेर पडला. त्याचा सुगंध सर्वत्र दरवळला. त्या श्र्वासातून एक “गाय” जन्मास आली. सुंगधातून जन्मल्यामुळे दक्ष प्रजापतीने तिचे “सुरभी” असे नाव ठेवले. सुरभीपासून अनेक गाई जन्मास आल्या. त्यामुळे सुरभी ही संपूर्ण गोवंशाची माता, जननी ठरली.
या सुरभीने एकदा तप आरंभिला. ब्रम्हदेव त्या घोर तपाने प्रसन्न झाला. त्याने सुरभीला अमरत्व प्रदान केले. तसेच त्रैलोक्याच्या वर असलेला एक स्वर्गही तिला बहाल केला; जो स्वर्ग “गोलोक” या नावाने ओळखला जातो. सुरभी या गोलोकात नित्य निवास करते आणि तिच्या कन्या, सुकन्या भूलोकात पृथ्वीवर राहतात. या गोलोकाचा अधिपती “गोविंद” अर्थात भगवान श्रीकृष्ण हा आहे.
सुरभी एकदा इंद्रदेवाच्या दारावर भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला गेली आणि पशुराज्याच्या विषयांची श्रीकृष्णाची सदिच्छा पाहून तिने त्यांना आपल्या गोलोकाचा “इंद्र” म्हणून निवडले. भगवान श्रीकृष्णाची गोभक्ती सर्वत्र प्रसिद्धच आहे. त्याने आपले लहानपण व बालपण गोकुलात घालवले, असे महाभारतात सांगितले आहे.
गोरूप पृथ्वी
गाय हे पृथ्वीचे प्रतीक मानलेले आहे. ज्या ज्या वेळी दैत्य, असुर माजतात व अधर्म वाढतो, त्यावेळी पृथ्वी “गोरूप” घेऊन भगवान विष्णूला शरण जाते आणि अवतार घेण्यासाठी प्रार्थना करते. पृथ्वीचे व गाईचे हे एकरूपत्व पृथू राजाच्या आख्यानातही सांगितले आहे.
पृथू राजाचा राज्याभिषेक झाल्यावर त्याचे सर्व प्रजाजन अन्न, वस्त्र करीत त्याच्याकडे आले आणि पृथ्वी अन्न पिकवीत नाही म्हणून त्याच्याकडे गऱ्हाणे करू लागले. त्यावेळी पृथू राजाला पृथ्वीचा राग आला आणि पृथ्वीला शासन करण्यासाठी त्याने शरसंधान केले. तेव्हा पृथ्वी घाबरली व गाईचे रूप घेऊन धावत-पळत सुटली. पृथू राजा तिच्या पाठीमागे धावू लागला. तो काही केल्या तिची पाठ सोडीना. तेव्हा गोरूप पृथ्वी पृथूला शरण गेली. तिने त्याला विचारले, “हे राजा! पृथ्वीवरच्या औषधी व वनस्पती मी खाऊन त्या पचवल्या आहेत, त्या तुला परत हव्या असतील तर माझ्या दुग्ध रूपाने त्या तुला मिळतील. परंतु तू एखादा “वत्स” आणून माझ्या कासेला, स्तनाला लाव आणि औषधी वनस्पती दोहून घे.
पृथू राजाने मग तसे केले. त्याशिवाय मग अन्य देव, ऋषी, गंधर्व, मानव या सर्वांनीही त्या प्रसंगी आपापले “वत्स” गोरूप पृथ्वीच्या कासेला लागून आपापल्या इच्छित वस्तू दोहून घेतल्या.
गाय ही इतरही अनेक वस्तूंचे व व्यक्तींचे प्रतीक बनली आहे. “इमे लोका जौ” म्हणजे हे सगळे लोक अर्थात विश्र्व गोरूप आहे असे शतपथ ब्राम्हणात (3.9.8.3) म्हटले आहे. “यज्ञो यै गौ” म्हणजे यज्ञ म्हणजेच गाय होय असे तैत्तरिय ब्राम्हणात (3.9.8.3.) म्हटले आहे. तसेच “अन्नं यै गौ” अर्थात अन्न म्हणजेच गाय होय. “विराजोवा एतद्रुपं यद् गौ” म्हणजेच गाय ही विराजाचे (सकल सृष्टीचे) रूप आहे. (तां.ब्रा.4.9.3.) गाय हे वाणीचेही प्रतीक आहे. “वाचं धेनुनुपासीत” म्हणजे वाचारूपी धेनूची उपासना करावी. (बुद्ध 5.8.1.) गाय ही गायत्रीचेही प्रतीक आहे.
ब्रम्हदेव ध्यानस्थ बसला असता त्याच्या मुखातून एक “धेनू” गाय बाहेर पडली. ती दुसरी कोणी नसून “गायत्री”च होती. भारतीय संस्कृतीत गाय ही विविध प्रकारे विश्र्व व्यापून उरली आहे. म्हणून महाभारतात पुढीलप्रमाणे म्हटले आहे.
यदा सर्व मिदं व्याप्त जगत्स्य वरज गमम्। गो माहात्म्य सांगणारी गोसूक्ते
तां धेनु शिरता नन्द्रे भूतभव्यस्य मातरमे।। (महाभारत, अनुशा.80-15)
नचिकेत प्रकाशन
प्रा. विजय यंगलवार किंमत : 40 रू.
औषधोपचाराबरोबरच शेतीच्या उपयोगितेची माहिती देणारे
पंचगव्य औषधोपचार
प्रा. विजय यंगलवार यांनी संपादित व शब्दांकित केलेले व नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेले पंचगव्य औषधोपचार हे सर्वांग सुंदर, माहितपूर्ण पुस्तक नुकतेच वाचनात आले. या एकोण ऐंशी पानी पुस्तकामध्ये पंचगव्याविषयी माहिती अक्षरश: ठासून भरलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक फक्त वाचनीयच नाही तर संग्राह्यही झाले आहे. पुस्तकाच्या नावावरून व अनुक्रमाणिकेवरून पुस्तक हे फक्त औषधोपचाराशी संबंधित असेल असे वाटते. परंतु या पुस्तकामध्ये औषधोपचाराबरोबरच पंचगव्याच्या शेतीसाठीच्या उपयोगिते बद्दलही भरपूर माहिती आहे.
पुस्तक एकंदर सात प्रकरणे व तीन परिशिष्टात विभागले आहे. पहिल्याच गोषडंग व पंचगव्य या प्रकरणाची सुरूवात गोमातेच्या गुणवर्णनापासून झाली आहे. वेदांपासूनचे गाई बद्दलचे अनेक संदर्भ सांगत लेखकाने पंचगव्य म्हणजे काय व गोषडंग म्हणजे काय याचे वर्णन केले आहे. पंचगव्य हा शब्द आपल्या परिचयाचा आहे परंतु गोषडंग हा शब्द कुठून आला? जर लेखकाने सांगितले असते तर बरे झाले असते. गोरोचनाबद्दलची माहिती उपयुक्त आहे.
दुसरे प्रकरण पंचगव्य आणि आयुर्वेद चिकित्सा असे आहे. आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धान्त, पंचमहाभूते, त्रिदोष यांचाही उल्लेख लेखकाने केला आहे. औषधोपचाराचे सर्व वर्णन आयुर्वेदीय परिभाषेला धरून परंतु जनसामान्यांना समजेल अशा भाषेत लेखकाने केले आहे. हे अतिशय स्तुत्य आहे. पंचगव्य बनविण्याची कृती व पंचगव्यातील द्रव्यांचे एकमेकांशी असलेले नेमके प्रमाण आधुनिक मोजमापाच्या परिभाषेत दिल्यामुळे पुढील सर्व विषय फारच सोपा झाला आहे. गाय जरी गोमाता असली तरीही तिचेही खाणेपिणे पूर्वीसारखे सकस व सात्विक राहिलेले नाही. त्यामुळे पंचगव्य वापरताना कोणती दक्षता घ्यावी याच्याही सूचना ग्रंथकाराने देऊन ठेवल्या आहेत. त्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचणे अति आवश्यक आहे. पंचगव्यांच्या द्रव्यांची एक उपयुक्त तालिकाही ग्रंथकाराने पृष्ठ क्र. 15 वर दिली आहे. थोडे मुद्रण दोष सोडल्यास ती तालिका अतिशय उपयुक्त आहे. पंचगव्याचा पीक वाढीसाठी व अन्य शेतीच्या कामासाठी काय उपयोग होतो, याचेही वर्णन या प्रकरणात आहे. पंचगव्याची आधुनिक विज्ञानाला अनुसरून असणारी माहितीही या प्रकरणात आहे.
तिसऱ्या प्रकरणामध्ये गोदूध आणि आयुर्वेद चिकित्सा यांचा उहापोह लेखकाने केला आहे. गाईच्या दुधाचे वर्णन व त्या विषयीची माहिती लेखकाने पुरेशा प्रमाणात दिली आहे, सैनिकांच्या घोड्यांना गाईचे दूध पाजले जात असे ही माहिती नवीन वाटली. तसेच सहा महिने गो सेवा करीत फक्त गोदुधाचे प्राशन केल्यास समाधी लागते, ही माहिती देखील नवीन वाटली. आधुनिक विज्ञानाशी निगडित माहिती सांगताना लेखकाने त्या त्या गोष्टींची लघुरूपे लिहिल्याने काही ठिकाणी अर्थबोध होत नाही उदा. दुधातील सी.एल.ए.घटक इ. आयुर्वेदानुसार दूध सिद्ध करणे, दुधाचे कुपथ्य, दूध केंव्हा कसे व कोणी वापरावे याविषयीची माहिती या प्रकरणात आली आहे. विशेषत: फळे व दुधाचा एकत्र वापर करू नये असे ग्रंथकार म्हणतो ते आयुर्वेदाला धरूनच आहे. गाईचे दूध वापरून तयार केलेली औषधे व शेतीसाठी दुधाचा उपयोग याचेही वर्णन लेखकाने केले आहे.
चौथ्या प्रकरणाचे नाव आहे. गोदही. आयुर्वेद चिकित्सा, यामध्ये दह्याचे गुणधर्म, दही केंव्हा टाळावे, ते कसे आणि केंव्हा वापरावे आणि त्याचे उपयोग थोडक्यात सांगीतले आहेत. दही हे आयुर्वेदाने अभिव्यंदी म्हणजे स्त्राव वाढविणारे व स्त्रोतसांचा अवरोध करणारे मानले आहे. त्यामुळे दह्याचा उपयोग केंव्हा टाळावा हे समजणे जास्त महत्वाचे आहे. रात्री दही खाऊ नये हा नियम साधारणत: आपणा सर्वांनाच माहिती आहे. परंतु दह्या मध्ये मीठ अथवा मिरे अथवा साखर मिसळल्याशिवाय दही खाऊ नये असेही आयुर्वेद म्हणतो. वर्षा, वसंत व शरद ऋतूमध्ये दही खाऊ नये असेही आयुर्वेद म्हणतो. याच प्रकरणात काही संदर्भ तक्राचेही आले आहेत परंतु तक्रावर स्वतंत्र पुस्तक होऊ शकेल इतकी माहिती उपलब्ध आहे.
गोतूप आयुर्वेद चिकित्सा असे पाचव्या प्रकरणाचे नाव आहे. यामध्ये अन्य प्रकरणांप्रमाणेच गाईच्या तुपाचे गुणधर्म, सिद्ध धृत तयार करण्याची पद्धती, तुपाचे उपयोग, तूप केव्हा टाळावे याची माहिती औषधी तुपांची वर्णने इत्यादीचे वर्णन आले आहे. शेतीच्या बियाणांच्या देखरेखीसाठी तुपाचा उपयोग कसा करावा याचेही वर्णन लेखकाने केले आहे. यज्ञामध्ये तांदळा बरोबर गाईचे तूप का वापरतात व त्याची आहुती दिल्याने पाऊस का पडतो याचे थोडक्यात पण वैज्ञानिक विवेचन लेखकाने केले आहे.
सहावे प्रकरण गोमुत्रावर आहे. गोमूत्र आणि आयुर्वेद यावर वैद्यवर्गाचे इतके अनुभव उपलब्ध आहेत व इतके संशोधन झाले आहे की या विषयावर देखील स्वतंत्र पुस्तक निर्माण होऊ शकेल. गोमूत्राचा अर्क बाजारात औषध म्हणून सहज उपलब्ध असल्याने ताज्या गोमूत्रा ऐवजी गोमूत्र अर्क वापरण्याची पद्धत सध्या रूढ झाली आहे. गोमूत्राचे अनेक उपयोग असले तरी ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी गोमूत्र सेवन करूनये. गंभीर रोगांमध्ये गोमूत्र अर्क वैद्याच्या मार्गदर्शनाखाली वापरणे अपेक्षित आहे. लेखकाने गोमूत्रावरील संशोधन थोडक्यात परंतु रोचक पद्धतीने मांडले आहे.
सातवे व शेवटचे प्रकरण गोशेण आणि आयुर्वेद असे आहे यामध्ये मुख्यत: गोशेणाच्या शेतीतील उपयोगावर जास्त भर दिला आहे. बायोगॅस पासून तर औषधी उपयोगापर्यंत मनुष्यजीवनाशीं संबंधित अनेक गोष्टी व गोशेण याचा संबंध लेखकाने विस्ताराने मांडला आहे. शेवटली तीन परिशिष्टेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पहिल्या परिशिष्टामध्ये आयुर्वेदातील अनेक शब्दांच्या परिभाषा दिलेल्या आहेत तर दुसऱ्या परिशिष्टात पंचगव्य औषधींची तालिका आहे. तिसरे परिशिष्ट रोग आणि पंचगव्य या स्वरूपाचे आहे. यावरून लेखकाचा व्यासंग लक्षात येतो.
वैद्य जयंत देवपुजारी
पंचगव्य औषधोपचार :
विजय यंगलवार
नचिकेत प्रकाशन
पृष्ठ :80 कि. 80 रू.
गौरवशाली भारतीय कालगणना
भारतीय कालगणना सर्वांना समजावी, त्यांचे महत्व, शास्त्रशुद्धपणा लक्षात यावा आणि त्याबद्दल गौरवाचा भाव निर्माण व्हावा, यासाठी नचिकेत प्रकाशन नागपूरने, “गौरवशाली भारतीय कालगणना” हे छोटेखानी आटोपशीर पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे.
अमेरिकेसह जगभर सोमवार नंतर मंगळवारच येतो, तो तसाच का येतो, याचे उत्तर फक्त भारतीय कालगणनाच देऊ शकते आणि जेव्हा भारत गुरूस्थानी होतो तेव्हा साऱ्या जगाने ही भारतीय पद्धती उचलली म्हणूनच जगभर सोमवार नंतर मंगळवारच येतो? या व अशा अनेक प्रश्नांची मनोरंजक व ज्ञानवर्धक माहिती व उत्तरे या पुस्तकात दिली आहे.
याशिवाय युगाब्द म्हणजे काय? तिथी कशाला म्हणतात? मुहुर्त कोणते? युगे 28 उभा विटेवरी, असे विठ्ठलाला म्हणतात. ही अठ्ठाविस युगे कोणती? काळाचे सर्वात लहान माप कोणते? ब्रम्हांडाचा काळ किती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यात आहेत. कालगणनेच्या सर्व संकल्पनांची माहिती थोडक्यात पण सोप्या स्पष्ट शब्दात यात दिली आहे.
सर्व कालगणनांची तुलनात्मक माहिती पण यात आहे तसेच. वाढदिवस कसा साजरा करावा?, कोणत्याही धार्मिक व शुभ कार्याच्या वेळा जो संकल्प करावयाचा असतो. तो पण यात पूर्ण दिला आहे.
आज जग 21 व्या शतकात नाही तर 52 व्या शतकात आहे, हे सर्वसामान्यांना कळावे कालगणना हा केवळ ज्योतिष्य व शास्त्रज्ञांचा विषय नाही तर सर्वसामान्य व्यक्तीचाही समजायचा विषय आहे. तेव्हा त्यांना तो समजावा म्हणजेच ते त्याला व्यवहारात आणू शकतील, म्हणून हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक आवर्जून वाचावे आणि भारतीय कालगणनेची माहिती करून घ्यावी व गौरवान्वीत व्हावे अशी माहिती यात ठासून भरली आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी वाचावे. असे हे पुस्तक प्रत्येक शाळेत, ग्रंथालयात व चोखंदळ वाचकांजवळ असणे आवश्यक आहे. नचिकेत प्रकाशनाने माहितीपर पुस्तकांची आपली परंपरा या मुळे अधिकच समृद्ध केली आहे.
गौरवशाली भारतीय कालगणना
पृष्ठ: 48, किंमत : 50/-
प्रकाशक :- नचिकेत प्रकाशन
24 योगक्षेम ले-आऊट, स्नेह नगर,वर्धा रोड,नागपूर -15.
फ़ोन: 0712-2285473 भ्र. 9225210130
चाणक्य सूत्रे
जितात्मा सर्वार्थैस्संयुज्येत्।
मनोनिग्रही मनुष्याला सर्व अर्थ प्राप्त होतात.
जगप्रसिद्ध आर्य चाणक्यच्या “कौटिल्य” अर्थशास्त्र या मानवी प्रतिभेचा उत्तुंग अविष्कार असणाऱ्या महान ग्रंथातील निवडक सूत्रे मूळ संस्कृत मध्ये आणि त्याचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेच अशा पद्धतीने “चाणक्य सूत्रे” या नावाने नचिकेत प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे.
मानवी व्यवहार व विविध संस्थागत व्यवस्थापन या संदर्भात आजही लागू होणारी किंबहुना याबद्दलच्या शहाणपणाचे सार असणारी ही सूत्रे म्हणजे आयते विचारधन आहे. केव्हाही कोणतेही पान उघडा दरवेळी तुम्हाला त्यात काही न काही विचार मौक्तिके सापडतील?
नागरी बॅंका, पतसंस्था या सारख्या आर्थिक विषयांशी संबंधित संस्थांमध्ये तर अशा पुस्तकांचे अधिकच महत्त्व आहे. प्रत्येक व्यवस्थापकाने नेहमी आपल्याजवळ बाळगावे व पारंपरिक, अनुभवसिद्ध चातुर्य ज्ञानाचा वापर आपल्या व्यवहारात करून आपण यशस्वी व्हावे व आपल्या संस्थेलाही यशस्वी बनवावी. सुमारे 400 हून अधिक सूत्रे असणाऱ्या या अनमोल पुस्तकांची किंमत केवळ 50/- रू. आहे.
चाणक्य सूत्रे/नचिकेत प्रकाशन/50रू.
24, योगक्षेम ले-आऊट, स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर -440 015.
फ़ोन:- 2285473 मो. 9225210130
यशस्वी व्यवस्थापनासाठी
समर्थ सूत्रे
आजच्याही जीवनात आणि आधुनिक व्यवस्थापनात उपयोगी पडेल, असे बहुमोल मार्गदर्शन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी दासबोध, मनाचे श्र्लोक आदी साहित्यातून तीन चारशे वर्षांपूर्वीच प्रचंड प्रमाणात केलेले आहे. पिढ्या-पिढ्यांनी आपल्या जीवनात त्यांचा यशस्वी उपयोगही केला आहे.
मात्र हे धार्मिक वाङमय आहे, असे समजून यापासून दूर राहणाऱ्या आजच्या आधुनिक समाजालाही या मार्गदर्शनाचा लाभ व्हावा, याकरिता यातील काही निवडक श्र्लोकांचे संकलन आधुनिक विषयानुरूप करून ते आपल्या समोर ठेवले आहे.
यातील काही विषय असे
१) प्रयत्नवादाचा पुरस्कार २) कार्यावरील श्रद्धा ३) मानवी मनाचा विचार ४) श्रवणाचा महिमा ५) प्रचितीचे बोलणे ६) सुंदर लिहिणे ७) कर्मचारी व्यवस्थापन ८) मनुष्यबळ व्यवस्थापन ९) कर्मचारी प्रशिक्षण १०) माणस घडवणं म्हणजे ११) व्यवस्थापन १२) कार्यप्रेरणा १३) गुण व्यवस्थापन १४)ताणतणावांचे १५) व्यवस्थापन १६) अधिकार कसा द्यावा? १७) व्यवस्थापन नेतृत्व १८) व्यवस्थापनाचे नीतिशास्त्र १९) उत्तम व्यवस्थापकाची लक्षणे २०)शिष्य कसा असावा? २१) यशस्वी व्यवस्थापनाची गुरूकिल्ली् २२) कार्यात यशस्वी २३) कसे व्हावे? २४) व्यवस्थापकीय मूल्ये २५) आळसाचे दुष्परिणाम २६) नेतृत्वाचा आदर्श २७) कार्यसंस्कृतीचा पुरस्कर्ता २८) संघटन कौशल्य २९) लोकसंग्रह आणि जनसंपर्क ३०) कार्यकर्त्याची गुणवैशिष्ट्ये ३१) शक्तीचे महत्त्व
विषयानुसार संकलन असल्यामुळे मनात असणाऱ्या विषयानुसार लगेच, फारसा शोध न करता त्यांना मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकेल. यामुळे लाभान्वित झाल्यामुळे दासबोध, मनाचे श्र्लोक आदी साहित्य मूळ व संपूर्ण वाचण्याची प्रेरणा त्यांना मिळेल, अशी आमची हे संकलन पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्यामागील भूमिका आहे.
चाणक्यसूत्रे, विदुरनीति आणि शुक्रनीति या प्राचीन व्यवस्थापनाचे अनुभव सिद्ध ज्ञान देणाऱ्या आधीच्या तीन पुस्तकांच्या मालिकेतील हे चौथे पुस्तक आहे. गुणग्राही वाचक याही पुस्तकांचे स्वागत करतील.
नचिकेत प्रकाशनाने हे एक उत्तम पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या 64 पानांच्या पुस्तकांची किंमत केवळ 50 रू. आहे. नचिकेत प्रकाशनाची दर्जेदार निर्मिती आहे.
यशस्वी व्यवस्थापनासाठी समर्थ सूत्रे
पृ.48 किं. 50 रू.
नचिकेत प्रकाशन, नागपूर 15
मो.: 9225210130
शुक्रनीती

प्राचीन भारतातील महान प्रकांड विद्वान, दैत्याचे गुरू, प्रति बृहस्पती असणारे श्री शुक्राचार्य यांचे जीवन व व्यवस्थापन विषयक विचार म्हणजे शुक्रनीती. आपण या प्राचीन शुक्रनीतीचा आजही लाभ घेऊ शको. अवलंब करू शकतो.
शुक्रनीतीमध्ये खालिल विषयांवर मार्गदर्शन आहे. मनुष्य स्वभाव : १)धूर्त २)दुष्टाची लक्षणे् ३) सज्जन व दुष्ट यांचे स्वभाव ४) मुर्खांचे लक्षण ५) मनुष्याचे पाच प्रकार ६) दूरदृष्टी युक्त ७) प्रत्युत्पन्नती ८) आळशी ९) साहसी १०)विलंबाने काम करणारा ११) उत्तम पुरूष १२) उत्तम,मध्यम व नीच मधील फरक १३) पूज्य नर आदी
पृ. 32किं. 30 रू.
Like this:
Be the first to like this page.