अहवाल स्पर्धा
नागरी बॅंका, नागरी पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था आणि मल्टीस्टेट पतसंस्था यांनी आपले वार्षिक अहवाल, त्याबद्दलची व प्रगतीची माहिती आणि मुखपृष्ठाची इमेज फाईल (सर्व शक्यतो सॉफ्ट स्वरूपात) पाठवावे. नचिकेत प्रकाशनाच्या समृद्धी ब्लॉगवर आणि फेसबुकवर त्यास प्रसिद्धी दिली जाईल आणि त्या आधारे त्यातून 3 उत्तम अहवाल म्हणून घोषित केले जातील. ही स्पर्धा नि:शुल्क असून सर्वांसाठी खुली आहे. माहिती पाठविण्याची मुदत 31 ऑगस्ट 2012 आहे.

