नचिकेत प्रकाशनाची सर्व पुस्तके आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वदूर सर्व प्रमुख गावी सर्व प्रमुख ग्रंथविक्रेते, ग्रंथ प्रदर्शन करणारे यांच्या कडे उपलब्ध होतीच. आता यापुढे ती इंटरनेटवर उपलब्ध झाल्यामुळे महाराष्ट्राबाहेर तसेच देशाबाहेर राहणारा वाचक वर्ग तसेच इंटरनेटवर खरेदी करणारा नवा वर्ग यांच्यासाठीही नचिकेत प्रकाशनांची पुस्तके खरेदी करणे सहज व सोपे झाले आहे. नचिकेत प्रकाशनाची सर्व पुस्तके आता इंटरनेटवर विविध वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध करून नचिकेत प्रकाशनने मोठा टप्पा गाठला आहे. मायबोली, बुक गंगा, माय हॅंग आऊट स्टोअर, फ्लिपकार्ट आणि इन्फिबीम या साईटवर नचिकेत प्रकाशनाचे सर्व पुस्तके, यांचे परिचय व अन्य माहितीसह विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यासाठी तसे विशेष विक्री करार या साईटच्या व्यवस्थापनाशी नचिकेत ने केले आहेत. नजिकच्या काळात आणखी काही साईटवर नचिकेतची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध होतील, असेही श्री. अनिल सांबरे यांनी या पत्रकात पुढे म्हटले आहे. नचिकेत प्रकाशनाच्या ब्लॉगवर वाचक रोज मोठ्या संख्येने भेट देत असतात. या ब्लॉग वर नचिकेत प्रकाशन संबंधित सर्व माहिती, नवी पुस्तके, पुस्तक परिचय, विविध योजना, वाचकांच्या प्रतिक्रिया आदी माहिती असते. त्यामुळे वाचनालये, शाळा, कॉलेज, यांचे ग्रंथपाल/प्राचार्य यांनी nachiketprakashan.wordpress.com ला खरेदीपूर्वी भेट द्यावी, असे आवाहन नचिकेत ने केले आहे. या संदर्भात कोणत्याही खुलासा चे माहितीसाठी nachiketprakashan@gmail.com वर किंवा 9225210130 वर संपर्क साधावा, असे आवाहन नचिकेत प्रकाशनाने केले आहे.
नचिकेत प्रकाशने आता ई-बुक स्वरूपातही उपलब्ध
नचिकेत प्रकाशनाची काही निवडक पुस्तके आता ई-बुक स्वरूपात तयार होत असून 15 ऑगस्ट पासून ती लोकांना लेेज्ञसरपसर.लेा वर विकत घेता येतील, असे नचिकेत प्रकाशनाचे संचालक श्री. अनिल सांबरे यांनी म्हटले आहे. नचिकेत प्रकाशन आणि बुक गंगा यांनी संयुक्तरीत्या हा e – books वर प्रकल्प राबविण्याचे ठरवले आहे. e – बुक ची किंमत प्रत्यक्ष पुस्तकापेक्षा 10%ने कमी राहणार आहे. ही पुस्तके तुम्हाला विकत घेतल्यावर एकतर तुमच्या कम्प्युटरवर डाऊनलोड करता येईल किंवा आयपॉडवर डाऊनलोड करता येईल. मात्र याची इतरत्र कॉपी करता येणार नाही. किंवा यांचा प्रिंट आऊटही काढता येणार नाही. नवीन पिढीच्या वाचकवर्ग तसेच देशाबाहेरही अमेरिका युरोप येथे मराठी वाचक वर्गाला बुक रीडर वरच पुस्तके वाचण्याची सवय लागली आहे त्यांची ही गरज आता नचिकेत प्रकाशनांच्या इ-बुक्स ने पूर्ण होऊ शकेल. यात सर्व व्यवहार ऑन लाईनच होणार आहेत. यापुढे काही पुस्तके फक्त ई-बुक स्वरूपातच काढण्याचीही नचिकेत प्रकाशनाची योजना असून त्यानुसार आखणी सुरू आहे, असे पत्रकात कळवले आहे.